Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी विनी रमन सध्या प्रेग्नंट आहे.
विनी रमण भारतीय वंशाची आहे. त्यामुळे तिचे डोहाळ जेवण भारतातील पारंपारिक तमिळ पद्धतीने करण्यात आले.
विनीने तिच्या वलायकाप्पू समारंभाचे (डोहाळ जेवणाचे) फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
विनीने शेअर केलेल्या एका फोटोत तिने हातात बांगड्या घातल्याचा फोटोही शेअर केला असून हे तिच्या बँगल्स सेरेमनीच्या दरम्यानचा असल्याचे तिने कॅप्शनमध्ये सांगितले आहे.
तसेच विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती साडी नेसून पारंपारिक पद्धतीने नटलेली दिसत आहे.
तसेच विनीच्या या समारंभात तिचे कुटुंबिय देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
विनीने या समारंभादरम्यानचा ग्लेन मॅक्सवेलबरोबरचा देखील फोटो शेअर केला आहे.
विनी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी गेल्यावर्षी ख्रिश्चन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे.