Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला तब्बल 309 धावांनी पराभूत केले.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रलियाच्या विजयात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे तो सामनावीरही ठरला.
या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले.
मॅक्सवेलने ही खेळी करताना त्याने 40 चेंडूत शतक केले होते.
त्यामुळे मॅक्सवेल वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा क्रिकेटपटू ठरला.
मॅक्सवेलने 18 दिवसांपूर्वीच म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी 2023 वर्ल्डकपमध्येच दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करमने केलेल्या विश्विविक्रम मोडला आहे.
मार्करमने दिल्लीलाच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात 49 चेंडूत शतक झळकावले होते.
मॅक्सवेलचे हे शतक वनडेमधील चौथ्या क्रमांकाचेही सर्वात वेगवान शतक ठरले.