दैनिक गोमन्तक
काही वेळा काचेची भांडी साबणाने घासल्यानंतर पण चमकदार दिसत नाहीत.
त्यामुळे काचेची भांडी घासायला तुम्ही बोरेक्स पावडरचा वापर करु शकता.
एका मोठ्या पातेल्यामध्ये पाण्यात बोरेक्स पावडर टाकून काचेची भांडी त्यात टाका.
थोड्या वेळाने दूसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, आता कसले डाग राहणार नाहीत.
काचेची प्लेट, ग्लास या भांड्यावरचे डाग घालवायचे असेल तर गरम पाण्यात अमोनिया काही थेंब, 1 चमचा मीठ टाका.
याने काचेची भांडी घासल्यावर एकदम चमकदार दिसतात.
काचेचे ग्लास चमकदार बनविण्यासाठी पाण्यात अगदी चिमूटभर नीळ घाला आणि या पाण्याने ग्लास धुवा.
चहा पावडरचा वापर करुन पण काचेची भांडी स्वच्छ निघतात.