दैनिक गोमन्तक डिजिटल
बदामाचे कठीण कवच फोडून निघणारी आतील बी गोड ,धातुवर्धक.पौष्टिक, पुरुषत्व वाढवणारी, वात-पित्तनाशक गुणांची असते.
भिजून पाण्यात एकजीव केलेले बदाम, अश्वगंधा चूर्ण, पिंपळी चूर्ण यांचे समप्रमाणात केलेले मिश्रण तूप-साखर-दूधात मिसळून प्यायल्यास महिलांच्या कंबर दुखीच्या विकारात चांगला फायदा होतो.
बदामाची खीर आजारातून उठलेले, वृद्ध, बाळंतीण यांना दिल्यास लवकर आराम मिळतो.
बदाम दुधात उगाळून त्यात खडीसाखर आणि तूप घालून केलेली थंडाई ही अत्यंत पौष्टिक आणि बलवर्धक गुणांची असते.
बदामाच्या कठीण सालीची जाळून राख बनवावी. ही राग दंतमंजनाप्रमाणे दातांना लावल्यास दात स्वच्छ आणि बळकट होतात.
श्रीमंतांचे फळ म्हणून ओळखला जाणारा बदाम बुद्धिमत्ता, शक्तिवर्धक, पौष्टिकता यांसारखे अनेक फायदे देतो.
बदाम आणि कापूर दुधात उगाळून मस्तकावर त्याचा लेप लावल्यास डोकेदुखी थांबते, शांत झोप लागते.