Akshata Chhatre
महागड्या क्रीम्स विसरा, घरात असलेल्या तुरटीनेच त्वचेला नैसर्गिक तेज द्या.
तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. गुलाबपाण्यात तुरटीची पावडर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास मुरुमं कमी होतात.
तुरटी त्वचेतली अतिरिक्त ओलसरता शोषते. त्वचा कोरडी न होता मृदू आणि संतुलित राहते.
रात्री तुरटी, गुलाबपाणी आणि ग्लिसरीन यांचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास टॅनिंग आणि डाग कमी होतात.
तुरटी त्वचेला घट्ट ठेवते आणि सुरकुत्या कमी करते. त्वचा दिसते अधिक तरुण व तेजस्वी.
तुरटीमुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषण मिळतं, ज्यामुळे रंग उजळतो आणि चेहरा तजेलदार दिसतो.
आठवड्यातून २-३ वेळा वापर पुरेसा आहे. त्वचेसाठी हा घरगुती, सुरक्षित आणि परिणामकारक उपाय नक्की करून पाहा!