Akshata Chhatre
गौतमी पाटीलचा नवाकोरा राधा लूक सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे. पारंपरिक सौंदर्य आणि ग्लॅमरचा अप्रतिम संगम साधत तिने या लूकमधून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
नाजूक झरीकाम असलेला गडद निळा लेहेंगा, त्यासोबत सोनेरी धाग्याने भरतकाम केलेला गुलाबी ब्लाऊज; हे रंग आणि डिझाईन्स तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच उठाव देतात
गळ्याभोवती सोन्याचा आकर्षक हार, कानात झळकणारे मोठे झुमके आणि नाजूक नथ यामुळे तिच्या चेहऱ्याचा मोहकपणा अधिक खुलून दिसतो.
तिने केलेला साधा पण उठावदार मेकअप हलकी गोल्डन शेड्स, गुलाबी लिपस्टिक, डोळ्यांवर काजळ आणि आयलाइनर तिच्या भावभावनांना नाजूक स्पर्श देतो.
अर्धे बांधलेले केस, त्यात पांढऱ्या गजऱ्याचा सुवासिक थर, आणि कपाळावरची छोटी लाल टिकली हा लूक पूर्ण करतो.
हातांवरील बारीक वेलीसारखी मेहेंदीची नक्षी, सोन्याच्या बांगड्या आणि अंगठ्यांसोबत एकदम राजेशाही दिसते.
चाहते कमेंट्समध्ये तिला “परफेक्ट राधा” म्हणत कौतुकाचा वर्षाव करत आहेत.