Pramod Yadav
दक्षिण गोव्यातील साळावली धरण एक राज्यातील एक प्रमुख धरण असून, पर्यटकांसाठी देखील आकर्षण केंद्र आहे.
धरणाच्या स्पिलवेमधून पडणारे पाणी जिथून वाहते त्याच्याजवळच एक सुंदर गार्डन आहे.
भव्य गार्डनमध्ये हिरवाईसह मनोरंजन आणि खेळण्या बागडण्यासाठी विविध सोय करण्यात आली आहे.
गार्डनमध्ये लाँग वॉकची सोय
बागेत शोच्या झाडांना विविध आकार देण्यात आले आहेत.
बागेत फेरफटका मारताना प्रसन्नतेचा अनुभव येतो.
बागेतील स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जुन भेट देतात.
झाडांना दिलेले कलात्मक आकार बागेची सुबद्धता अधोरेखित करतात.
झाडांचे विशेष आकारच बागेचे मुख्य आकर्षण आहे.
याशिवाय बागेत अनेक खेळाचे आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करण्यात आली आहेत.
बागेत रस्सी आणि लाकडांचा बांधलेला झुलता पूल त्यावरून चालताना थरारक अनुभव देतो.