Akshata Chhatre
भगवान गणेशाच्या कथांमधून आपल्याला जीवनासाठी अनेक मोलाचे धडे मिळतात.
चांगल्या सुरुवातीचा आणि बुद्धीचा देव म्हणून त्याच्या नावाने प्रत्येक नवीन कार्याची सुरुवात केली जाते.
कारण बाप्पा शिकवतात की अडथळे कितीही मोठे असले तरी चिकाटी, योग्य वृत्ती आणि आत्मविश्वासाने ते पार करता येतात.
उंदीर हे त्यांचे वाहन असल्याने, लहानात लहान आणि कमकुवत प्राण्याचाही आदर करणे महत्त्वाचे आहे, हे ते सांगतात.
पालकांचा आदर व आज्ञाधारकपणा हा गणेशजींच्या जीवनातील मोठा संदेश आहे.
बुद्धीचे उदाहरण देताना त्यांनी पालकांनाच प्रदक्षिणा घालून दाखवले की हुशारीने विचार केल्यास कठीण कार्य सोपे करता येते.
महाभारत लिहिताना दात तोडून पेन बनवण्याच्या प्रसंगातून समर्पणाची आणि त्यागाची शिकवण मिळते.