Akshata Chhatre
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना गोव्यातील मूर्तीकारांच्या हाताला अक्षरशः पंख फुटले आहेत.
चिखल, माती आणि रंगांनी नटलेले हात सतत कामात गुंतलेत, कारण शेकडो गणेशमूर्ती आधीच बुक होऊन ठरलेल्या भक्तांच्या घरी पोहोचण्यास सज्ज आहेत.
या गर्दीतही काही मूर्ती खास असतात. भक्तांच्या आवडीनुसार बसवलेली मुद्रा, सजावट किंवा वेगळी ओळख असलेली मूर्ती कलाकार घडवतात.
कुठे गणपतीच्या मुकुटावर अंतिम रंगांची झळाळी चढवली जाते, तर कुठे डोळ्यांत भक्तिभाव उतरवण्याची नाजूक कामगिरी सुरू असते.
यंदा पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. मातीच्या, नैसर्गिक रंगांनी सजवलेल्या मूर्तींना प्राधान्य दिलं जातंय.
मूर्तीकारांसाठी हे दिवस म्हणजे झोप विसरून काम, घाईगडबड, तणाव; पण त्यांच्यासाठी प्रत्येक मूर्ती ही उपजीविकेइतकीच भक्तीचीही मूर्ती असते.
कारण त्यांच्या हातून साकारलेला बाप्पा हजारो घरांमध्ये सुख, शांती आणि आनंद घेऊन जाणार असतो.