Pramod Yadav
गोवा, महाराष्ट्रासह देशातील विविध भागात आज लाडक्या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी देखील गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी पत्नीसह बाप्पाचे पूजन केल्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
आकर्षक गणेश मूर्ती आणि माटोळीची सजावट उठून दिसत आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत गणेशाची पूजा करताना
मुख्यमंत्री सावंत यांच्या घरी गणेश स्थापनेवेळी कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी समस्त गोमन्तकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.