Pranali Kodre
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो.
मैत्री कुठेही, कधीही आणि कोणाबरोबरही होऊ शकते, असे म्हटले जाते. अनेक क्रिकेटपटूही आहे, ज्यांची अशी मैत्री आहे.
आपणही अशा क्रिकेटपटूंवर नजर टाकू, ज्यांनी देशांच्या सीमा न पाहाता एकमेकांशी मैत्री केली आणि ते क्रिकेट मैदानातील जरी प्रतिस्पर्धी असले किंवा होते, तरी मैदानाबाहेर मात्र पक्के मित्र म्हणून ओळखले जातात.
भारताचा विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स हे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना एकमेकांची खूप चांगले मित्र बनले. अनेकदा ते एकमेंकाचे कौतुक करतानाही दिसतात.
भारताच्या सचिन तेंडुलकरची वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न यांच्याशी घट्ट मैत्री होती. ते मैदानात जरी एकमेंकाचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले असले, तरी मैदानाबाहेर मात्र त्यांनी त्यांची मैत्री जपली.
इंग्लंडचे इयान बॉथम आणि वेस्ट इंडिजचे विवियन रिचर्ड्स यांच्यात ते खेळत असताना मैत्री झाली होती. पण त्यांची मैत्री निवृत्तीनंतरही कायम राहिली.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना भारताचा एमएस धोनी आणि वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्रावो यांच्यात घट्ट मैत्री झाली. अनेकदा हे दोघे एकमेकांचे कौतुक करताना दिसतात.
इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम हे मैदानातील प्रतिस्पर्धी मैदानाबाहेर मात्र खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सकडून एकत्र क्रिकेटही खेळले आहे.
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू कायरन पोलार्ड यांच्यात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना चांगली मैत्री झाली.
भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्यात चेन्नई सुपर किंग्सकडून एकत्र सलामीला फलंदाजी करताना घट्ट मैत्री झाली.