एका IPL हंगामात पहिले 5 सामने पराभूत होणारे संघ

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धेत 15 एप्रिल रोजी झालेल्या 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरने 23 धावांनी पराभव केला.

Delhi Capitals | Dainik Gomantak

दिल्ली कॅपिटल्सचा हा आयपीएलच्या 16 व्या हंगामातील हा सलग पाचवा पराभव आहे.

Delhi Capitals | Dainik Gomantak

त्यामुळे पहिल्या पाच सामन्यांनंतरही दिल्ली कॅपिटल्सचे गुणांचे खाते उघडलेले नाही.

Delhi Capitals | Dainik Gomantak

महत्त्वाचे म्हणजे दिल्लीने एका आयपीएल हंगामात पहिले पाच सामने गमावण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2013 साली आयपीएलमध्ये देखील दिल्लीने सलग सहा सामने हरले होते.

Delhi Capitals | Dainik Gomantak

दिल्लीव्यतिरिक्त आणखी तीन संघांनी एका आयपीएल हंगामात सलग पहिल्या पाच सामन्यात पराभव स्विकारला आहे.

Royal Challengers Bangalore | Dainik Gomantak

डेक्कन चार्जर्स 2012 साली आयपीएलमध्ये सुरुवातीचे सलग 5 सामने पराभूत झाले होते.

Deccan Chargers | Dainik Gomantak

मुंबई इंडियन्सनेही असा नकोसा विक्रम 2014 आणि 2022 सालच्या आयपीएलमध्ये केला आहे.

Mumbai Indians | Dainik Gomantak

मुंबई इंडियन्सने 2014 मध्ये पहिल्या 5 सामन्यात पराभव स्विकारला होता, तसेच 2022 मध्ये तर त्यांना पहिल्या सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

Mumbai Indians | Dainik Gomantak

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 2019 साली आयपीएलमध्ये पहिल्या 6 सामन्यांमध्ये सलग पराभव स्विकारला होता.

Royal Challengers Bangalore | Dainik Gomantak
Rishabh Pant | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी