टीम इंडियाचे भविष्य ठरू शकणारे 4 Left-Hand Pacers

Pranali Kodre

गेल्या काही क्रिकेट सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांना मिचेल स्टार्क, शाहीन आफ्रिदी, ट्रेंट बोल्ट यांसारख्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी कठीण प्रश्न विचारल्याचे दिसते.

Mitchell Starc | Dainik Gomantak

साधारणत: जेव्हा संघात डावखुरा वेगवान गोलंदाज असतो, तेव्हा कोणत्याही संघाला त्याचा जास्तीत जास्त वेळा फायदाच होतो.

Trent Boult | Dainik Gomantak

भारतीय संघासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या झहीर खान, इरफान पठाण, आशिष नेहरा अशी काही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची उदाहरणे देखील आहेत.

Zaheer Khan | Dainik Gomantak

मात्र, सध्या भारतीय संघात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची कमी भासत आहे. त्यामुळेच ही जागा भविष्यात भरून काढण्यासाठी कोणत्या गोलंदाजांचा पर्याय आहे याकडे एक नजर टाकू.

Team India | Dainik Gomantak

अर्शदीप सिंगने भारतीय संघाकडून पदार्पणही यापूर्वीच केले आहे. तसेच त्याची कामगिरीही चांगली झाली असून तो देखील भविष्यासाठी डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

Arshdeep Singh | Dainik Gomantak

खलील अहमदनेही अनेकदा त्याच्या कामगिरीने प्रभावित केले असून तोही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीसाठी चांगला पर्याय आहे.

Khaleel Ahmed | Dainik Gomantak

मोहसीन खान आयपीएलमधून प्रकाशझोतात आला आहे. त्याने 2022 आयपीएलमध्ये अनेकांना प्रभावित केले होते. त्यामुळे तोही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीसाठी एक पर्याय ठरू शकतो.

Mohsin Khan | Dainik Gomantak

आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणारा मुकेश चौधरीने गेल्या हंगामात त्याच्या गोलंदाजी सर्वांचे लक्ष वेधले. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो महाराष्ट्राच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असून तोही डावखुऱ्या गोलंदाजीसाठी चांगला पर्याय आहे.

Mukesh Choudhary | Dainik Gomantak
Cricket Duck | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी