Pranali Kodre
न्यूझीलंड क्रिकेट संघाने 28 फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत 1 धावेने विजय मिळवला.
हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावांनी मिळवलेला विजय ठरला.
विशेष म्हणजे या सामन्यात न्यूझीलंडला फॉलोऑन मिळाला होता.
त्यामुळे फॉलोऑन मिळालेल्या संघाने विजय मिळवलेला हा क्रिकेट इतिहासातील चौथाच कसोटी सामना ठरला.
यापूर्वी सर्वात आधी इंग्लंडने डिसेंबर 1894 मध्ये सिडनीत झालेल्या कसोटी सामन्यात फॉलोऑन नंतर देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 धावांनी विजय मिळवला होता.
त्यानंतर इंग्लंडनेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध जुलै 1981 मध्ये लीड्स कसोटीत फॉलोऑन मिळाल्यानंतर 18 धावांनी विजय मिळवला होता.
भारतीय संघानेही असा कारनामा करून दाखवला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2001 मध्ये कोलकाता कसोटीत फॉलोऑन मिळाल्यानंतरही तब्बल 171 धावांनी विजय मिळवला होता.