Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकतीच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली.
गांगुली त्याची पत्नी डोनासह बांगलादेश दौऱ्यावर गेला होता.
या दौऱ्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गांगुलीने या दौऱ्यात शेख हसीना यांच्यासह बांगलादेश क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
तसेच त्याने या दौऱ्यादरम्यान डीएनसीसी महापौर चषक 2023 या देशांतर्गत स्पर्धेचे उद्घाटनही केले.
गांगुलीने शेख हसीना यांची ढाकामधील गणभवनमध्ये भेट घेतली.
यावेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हक पापोन देखील उपस्थित होते.
यावेळी गांगुलीने असेही म्हटले की बांगलादेश क्रिकेट संघाला भारतात होणाऱ्या आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये बाद फेरीत प्रवेश करण्याची चांगली संधी आहे.
सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स संघाचा संचालक म्हणून काम पाहातोय.