Akshata Chhatre
नुकतेच तिशी पार केलेले अनेक तरुण-तरुणी एकाच समस्येमुळे त्रस्त दिसतात कपाळावरील केस विरळ होणे आणि बेबी हेअर्सचा हळूहळू गळून जाणे. यामुळे आत्मविश्वासाला धक्का बसतो.
सुरुवातीला फक्त थोडी केसगळती जाणवते, पण नंतर ती समस्या ठळकपणे दिसू लागते.
केसांची ट्रीटमेंट, महागडी तेलं आणि शाम्पू वापरूनही फारसा फायदा होत नाही, आणि शेवटी हताश वाटू लागतं.
अशा वेळी एक घरगुती, नैसर्गिक आणि सोपा उपाय खूपच फायदेशीर ठरू शकतो. कोथिंबीर जी रोजच्या जेवणात वापरली जाते.
तिच्या पानांमध्ये असलेले आयर्न, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी केसांच्या मुळांना मजबूती देतात.
कोथिंबीरीचा ताजा रस केसांच्या मुळांवर लावल्याने स्काल्पमधील रक्ताभिसरण वाढते, मुळांना पोषण मिळते आणि नव्या केसांची वाढ सुरू होते.
विशेषतः बेबी हेअर्स गळण्याची समस्या कमी होते आणि हळूहळू त्या जागी नवीन केस उगवू लागतात.