गोमन्तक डिजिटल टीम
कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असल्यास हरभरा डाळीचे पीठ प्रभावी जागेवर लावावे.
डाळीच्या पीठाने रंग उजळतो.
चेहऱ्यावर मुरुम असतील तर एक चमचा दही घेऊन त्यात थोडसं डाळीचं पीठ घालावं. त्यानंतर हा लेप चेहऱ्यावर लावावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.
केस रुक्ष किंवा कोरडे असतील तर डाळीच्या पीठाने केस धुवावेत.
सतत घाम येऊन शरीरातून दुर्गंधी येत असल्यास अंघोळ करताना डाळीच्या पीठाचा लेप लावावा.
हरभरा स्नायूवर्धक आहे. त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांनी हरभऱ्याचं नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरू शकतं.
वातप्रकृतीच्या व्यक्तींनी हरभरा डाळ किंवा हरभऱ्याचं सेवन करु नये.
पचनशक्ती मंद असणाऱ्यांनी किंवा अपचनाचा त्रास होणाऱ्यांनी हरभऱ्याचं सेवन टाळावं.