तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा; मूड राहील फ्रेश!

Akshata Chhatre

कामाचा ताण

दैनंदिन जीवनात ताण, कामाचा ताण आणि चिंता यांसारख्या गोष्टींमुळे मूड खराब होतो.

foods for stress relief|foods to boost mood | Dainik Gomantak

आहाराचा परिणाम

अशावेळी आपल्याला वाटते की मूड चांगला करण्यासाठी बाहेर फिरायला जाणे किंवा मित्रांना भेटणे पुरेसे आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या आहाराचा तुमच्या मूडवर थेट परिणाम होतो?

foods for stress relief|foods to boost mood | Dainik Gomantak

केळी

केळी हे केवळ भूक भागवणारे स्नॅक नाही, तर ते मन प्रसन्न ठेवण्यासही मदत करते. यात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल असते, जे शरीरात सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते.

foods for stress relief|foods to boost mood | dainik Gomantak

काजू

काजूमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूच्या कार्यासाठी अत्यावश्यक आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि थकवा वाढू शकतो. नियमितपणे काही काजू खाल्ल्यास ऊर्जा मिळते आणि मूड स्वाभाविकपणे सुधारतो.

foods for stress relief|foods to boost mood | Dainik Gomantak

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूत रक्तप्रवाह सुधारतात आणि सेरोटोनिनचे उत्पादन वाढवतात. यामुळे तणाव कमी होतो आणि मन हलके वाटते. मात्र, हे प्रमाणातच खाणे महत्त्वाचे आहे.

foods for stress relief|foods to boost mood | Dainik Gomantak

प्रोबायोटिक पदार्थ

ताक, दही, किमची किंवा केफिर यांसारखे प्रोबायोटिक पदार्थ शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि थेट मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

foods for stress relief|foods to boost mood | Dainik Gomantak

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन हा घटक असतो, ज्यात अँटी-इन्फ्लमेट्री आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे डोपामाइन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते.

foods for stress relief|foods to boost mood | Dainik Gomantak

Being Single Benefits: सिंगल लोक असतात जास्त आनंदी, का ते जाणून घ्या?

आणखीन बघा