Kavya Powar
अधूनमधून मूड बदलणे, राग येणे किंवा चिडचिड होणे सामान्य आहे.
पण जर तुमच्यासोबत असे वारंवार होत असेल तर तुम्ही लक्ष देणे आवश्यक आहे, कारण हे तेव्हाच घडते जेव्हा तुमच्या हार्मोन्समध्ये गडबड होते.
हार्मोन्स हे तुमच्या शरीराचे रासायनिक संदेशवाहक आहेत, जे रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागांपर्यंत पोहोचतात.
शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तणाव आणि मूड बदलू शकतो. यासाठी व्हिटॅमिन डीची कमतरता सूर्यप्रकाशाने भरून काढावी. याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात दूध, अंडी, मासे, संत्र्याचा रस, मशरूमचे सेवन करू शकता.
शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील चिंता आणि चिडचिड होऊ शकते. अशा परिस्थितीत मॅग्नेशियम युक्त अन्नाचे सेवन करावे. यासाठी तुम्ही पालक, भोपळ्याच्या बिया, शेंगा खाऊ शकता.
व्हिटॅमिन बी ची कमतरता देखील खराब मूडचे कारण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, बीन्स, पालेभाज्या, अंडी यांचा समावेश करू शकता.
ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् समृध्द आहार मूड सुधारण्यासाठी आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मासे, अक्रोड, चिया बिया इत्यादींचा समावेश करू शकता.