गोमन्तक डिजिटल टीम
चिडचिड ही एक प्रकारची मानसिक समस्या आहे. ज्याच्या मागे तणाव, चिंता अशी अनेक कारणे असू शकतात. चिडचिडेपणा कमी करण्याचे काही उपाय जाणून घेऊया.
चिडचिडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता. असे केल्याने मन शांत राहते आणि त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल.
अपूर्ण झोपेमुळे कधी कधी चिडचिड होते. हे कमी करण्यासाठी कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप घ्या.
जास्त विचार करण्याची सवय देखील तुमचा स्वभाव चिडखोर बनवू शकते.
चिडचिड कमी करण्यासाठी सकारात्मक राहणे खूप महत्वाचे आहे. अशा स्थितीत नेहमी स्वतःचा विचार करा आणि समजून घ्या.
चुकीचा आहार घेतल्याने रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होऊ शकतो आणि मूड बदलू शकतो, ज्यामुळे तुम्हाला चिडचिड होऊ शकते. अशावेळी फळे, हिरव्या भाज्या आणि काजू इ.