Akshata Chhatre
प्रत्येक विद्यार्थ्याला काहीतरी आवड असते. त्या आवडीला प्राधान्य देऊन, त्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक तयारी करा.
शालेय शिक्षण हे फक्त ज्ञान देत नाही, तर तुम्हाला महत्त्वाच्या जीवन कौशल्यांचा अभ्यासही करायला हवा. वेळ व्यवस्थापन, निर्णय घेणं, आणि चांगली संवाद क्षमता हे सर्व महत्त्वाचे आहे.
शाळेतील करिअर गाईडन्स सेशन्समध्ये सहभागी व्हा आणि वेगवेगळ्या करिअर पर्यायांची माहिती मिळवा. ह्यामुळे तुम्हाला कशापद्धतीने करिअर निवडावं हे कळेल.
शालेय जीवनात इंटर्नशिप करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करा. ह्यामुळे करिअरच्या बाबतीत निर्णय घेणे सोपे होईल.
तुमचे शिक्षक तुमच्यासाठी आदर्श असू शकतात. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन तुम्हाला करिअर ठरवताना मार्गदर्शन करू शकते. त्यांच्याशी संवाद साधा.
तुम्ही शाळेतील अभ्यासासोबतच, नवे कौशल्य शिकणे सुरू करा. संगणक, इंग्रजी बोलणे, किंवा इतर क्षेत्रातील ज्ञान मिळवून तुमच्या करिअरच्या संधींना विस्तृत करा.