Kavya Powar
स्मार्टफोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर येणे आता सामान्य झाले आहे.
त्यांच्या मदतीने हॅकर्स तुमच्या संपूर्ण सिस्टीमचा डेटा चोरी करू शकतात
तुमचा स्मार्टफोन हॅक होऊ नये यासाठी काही सवयी स्वत:ला लाऊन घेणे गरजेचे आहे
कोणत्याही अज्ञात स्त्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करू नका. यामुळे फोनमध्ये व्हायरसची फोनमध्ये एंट्री होऊ शकते
कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याची माहिती वाचा आणि ॲप आपला डेटा कसा वापरणार आहे ते समजून घ्या.
तुमच्या फोन आणि ॲप्सवर मजबूत पासवर्ड वापरा. सर्व खात्यांसाठी किंवा ॲप्ससाठी समान पासवर्ड वापरू नका.
तुमच्या फोनची कॅशे मेमरी वेळोवेळी हटवा. तुमचा ब्राउझिंग इतिहास तपासत राहा आणि तुम्हाला माहीत नसलेला कोणताही साइट इतिहास दिसल्यास सतर्क व्हा.
तुमच्या फोनचे ॲप्स आणि फोन अपडेट करत रहा.