Akshata Chhatre
केस गळणे आणि टक्कल पडणे ही समस्या आता केवळ पुरुषांपुरती राहिलेली नाही.
अनेक महिलांमध्येही ही समस्या दिसून येते, विशेषतः पुढील बाजूस किंवा बाजूने हेअरलाइन मागे सरकणे ही समस्या वाढत आहे.
या स्थितीला 'ट्रॅक्शन एलोपेसिया' म्हणतात. यामध्ये केसांवर सतत ताण पडल्यामुळे पुढील भागातील केस गळू लागतात आणि टक्कल पडल्यासारखे पॅचेस दिसू लागतात.
मोठ्या दातांच्या कंगव्याने केस विंचरा. सिल्क स्क्रंचीच्या मदतीने ढीला पोनीटेल बनवा आणि केस फिरवून स्क्रंचीमध्ये त्याचे टोक अडकवा. बन घट्ट नसावा.
लहानपणीच्या दोन सैल वेण्या घालणे यावर सर्वोत्तम उपाय आहे. वेण्या सैल असाव्यात, ज्यामुळे केसांवर ताण पडणार नाही.
सामान्य एक वेणी घाला, पण ती बाजूने किंवा मध्यभागी बारीक असावी. यामुळे केसांवर ताण कमी होतो.