सात वर्षांनंतर फुलणारी गोव्यातील ‘कारवी’

Pramod Yadav

कारवी

गोव्यात सात वर्षांनंतर फुलणाऱ्या कारवीच्या निळ्या-जांभळ्या फुलांचा आविष्कार पहायला मिळत आहे.

Strobilanthes Callosa

धारबांदोडा

सह्याद्रीतल्या पर्वत रांगात विसावलेल्या धारबांदोडा तालुक्यातल्या दूधसागर नदी किनारी वसलेल्या शिगावात सध्या हा पुष्पोत्सव पाहायला मिळत आहे.

Strobilanthes Callosa

पुष्पोत्सव

पावसाळी मौसमात पुष्पोत्सव सुरू होतो, तेव्हा आदिवासी आणि जंगलनिवासी सुखावतात.

Strobilanthes Callosa

गोडव्याचा खजिना

याचवेळी मधमाशा घोटींग, माडत, किंदळ अशा महाकाय वृक्षांच्या फांद्यावरती माधुर्यपूर्ण गोडव्याचा खजिना असणारे पोळे तयार करतात.

Strobilanthes Callosa

शिगाव

शिगाव -कुळे जैवविविधता व्यवस्थापन मंडळाने रानटी भाज्यांच्या महोत्सवाचे आयोजन सरकारी हायस्कूल शिगाव येथे केले होते.

Strobilanthes Callosa

निळा - जांभळा रंगोत्सव

दर सात वर्षांनंतर कारवीच्या झुडपांना आनंदाचे जे उधाण येते. त्याचे रुपांतर निळ्या - जांभळ्या रंगोत्सवात होते.

Strobilanthes Callosa

मधाची पोळी

कारवी फुलातल्या मधाचा आस्वाद घेणाऱ्या मधमाशा महाकाय वृक्षांवरी मधाची मोठी पोळी तयार करतात.

Strobilanthes Callosa
Goa govt Phd stipend | Dainik Gomantak