Shane Watson च्या नावे असलेले 'हे' 5 मोठे रेकॉर्ड्स माहितीयेत का?

Pranali Kodre

वाढदिवस

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉटसन 17 जून 2023 रोजी 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Shane Watson | Twitter

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

ऑस्ट्रेलियाकडून 307 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या वॉटसनने 14 शतकांसह 10950 धावा केल्या आहेत. तसेच 291 विकेट्स घेतल्या आहेत.

Shane Watson | Twitter

अष्टपैलू

वॉटसन वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारा आणि 150 विकेट्स घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.

Shane Watson | Twitter

टी20 विक्रम

तो टी20 सामन्यामध्ये शतक आणि 4 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू आहे.

Shane Watson | Twitter

पहिला ऑस्ट्रेलियन

ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिला खेळाडू आहे.

Shane Watson | Twitter

आयसीसी ट्रॉफी

वॉटसन ऑस्ट्रेलियाच्या 2006 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2007 वर्ल्डकप, 2009 चॅम्पियन्स ट्रॉफी, आणि 2015 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता.

Shane Watson | Twitter

आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतक

वृद्धिमान साहानंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतक करणारा तो दुसराच खेळाडू आहे. त्याने 2018 आयपीएल अंतिम सामन्यामध्ये शतक करत चेन्नईसॉ सुपर किंग्सला विजेतेपद मिळवून दिले होते. साहाने 2014 आयपीएल अंतिम सामन्यामध्ये शतक केलेले.

Shane Watson | Twitter

कुटुंब

वॉटसनने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर ली फरलाँगशी लग्न केले. त्यांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Shane Watson | Instagram
Ashes Cup | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी