Pranali Kodre
आयसीसीने 22 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमावारीत 40 वर्षीय जेम्स अँडरसनने गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला.
त्यामुळे तब्बल 1466 दिवसांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला अव्वल क्रमांक गमवावा लागला.
अँडरसनने अव्वल क्रमांक पटकावण्यापूर्वी कमिन्स सलग 1466 दिवस अव्वल क्रमांकावर कायम होता.
त्यामुळे तो आयसीसी कसोटी क्रमवारी गोलंदाजांच्या यादीत सर्वाधिक सलग दिवस अव्वल क्रमांकावर राहणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला.
आयसीसी कसोटीत क्रमवारीत सर्वाधिक सलग दिवस अव्वल क्रमांकावर राहण्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनच्या नावावर आहे.
स्टेन तब्बल 2343 दिवस कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज होता.
त्याच्या पाठोपाठ कर्टली अँब्रॉस असून ते 1719 दिवस अव्वल क्रमांकावर होते.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन असून तो 1711 दिवस अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज होता.
चौथ्या क्रमांकावर पॅट कमिन्स असू त्याच्या पाठोपाठ पाचव्या क्रमांकावर ग्लेन मॅकग्रा आहे.
ग्लेन मॅकग्रा 1306 दिवस आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर होते.