Akshay Nirmale
आता गोव्यात मासेमारीसाठी युरोपीयन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
उत्तर गोव्यातील हणजुणे (Anjuna) येथे युरोपीयन पद्धतीच्या फिश केज कल्चरमार्फत मत्स्य उत्पादन घेण्यात येणार आहे.
मच्छिमार खाते, सीएमएमआरआय आणि समुद्ररत्न संस्था त्यासाठी सर्व्हे करत आहे.
या तंत्रज्ञानात खोल समुद्रात, धरणांमध्ये, लघु पाटबंधारे प्रकल्पात पिंजरे टाकून माशांचे उत्पादन घेता येते.
या फिश केज कल्चरमध्ये 6 ते 8 महिन्यांत विक्रीयोग्य माशांचे उत्पादन घेता येते.
याद्वारे तिलापिया, चणक, बासा या प्रजातींच्या माशांचे उत्पादन घेण्यात येणार आहे.
या पद्धतीच्या मासेमारीचा रोजगारासह निर्यातीसाठीही लाभ होणार आहे.