Sameer Panditrao
भारतातील पहिला छायाचित्र स्टुडिओ 'बॉर्न अँड शेपर्ड' होता.
जो १८६३ साली शिमल्यामध्ये स्थापन झाला होता.
छायाचित्रकार सॅम्युअल बॉर्न आणि चार्ल्स शेपर्ड यांनी भागीदारीत हा स्टुडिओ सुरु केला होता.
सुरुवातीला या स्टुडिओमधून स्थापत्यकला, लँडस्केप आणि टॉपोग्राफिकल फोटोग्राफीची कामे होत.
नंतर येथे राजघराणे, ब्रिटिश अधिकारी आणि युरोपीय प्रवाशांचे पोर्ट्रेट्स बनवले जाऊ लागले.
प्रवासी आठवणींचे फोटो या प्रकारातून प्रसिद्ध झाले.
या स्टुडिओने नकाशांचे दस्तऐवजीकरण करण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली.