FIH Men Pro League: भारतीय संघाची दमदार कामगिरी; आयर्लंडला चारली पराभवाची धुळ!

Manish Jadhav

एफआयएच हॉकी प्रो लीग

भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या एफआयएच हॉकी प्रो लीगमध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा पुन्हा एकदा दबदबा पाहायला मिळाला.

Team India | Dainik Gomantak

एकतर्फी सामना जिंकला

भारतीय हॉकी संघाने हा सामना एकतर्फी जिंकला, ज्यामध्ये भारताने 4-0 असा विजय मिळवला. त्याचवेळी, जेव्हा भारतीय संघाचा पहिल्या टप्प्यात आयर्लंडशी सामना झाला तेव्हाही भारताने 3-1 असा विजय मिळवला होता. या सामन्यात आयर्लंड संघाची सुरुवात चांगली झाली पण त्यांना एकही गोल करता आला नाही.

Team India | Dainik Gomantak

चार खेळाडूंचा जलवा

एफआयएच हॉकी प्रो लीगच्या आयर्लंडविरुद्धच्या रिटर्न लेग सामन्यात भारतीय संघासाठी चार खेळाडूंनी गोल केले.

Team India | Dainik Gomantak

भारताने चार गोल केले

खेळाच्या 14व्या मिनिटाला नीलम संजीप सेसने भारतीय संघाचे खाते उघडले. त्याने भारतासाठी पहिला पहिला गोल केला. यानंतर, मनदीप सिंगने 24व्या मिनिटाला गोल करुन भारतीय संघाला सामन्यात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. अवघ्या चार मिनिटांनी अभिषेकने गोल केला आणि भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत करुन 3-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा चौथा गोल शमशेर सिंगने खेळाच्या 34व्या मिनिटाला केला.

Team India | Dainik Gomantak

पेनल्टी कॉर्नर

भारताविरुद्धच्या या सामन्यात आयर्लंड संघाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेता आला नाही.

Team India | Dainik Gomantak

भारतीय संघाची कामगिरी

या सामन्याच्या 9व्या मिनिटाला आणि नंतर 58व्या मिनिटाला आयर्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांना तो गोलपोस्टच्या आत पाठवता आला नाही. भारतीय हॉकी संघाला एफआयएच प्रो-लीगमध्ये त्यांचे पुढील दोन सामने 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. या लीगमध्ये भारतीय संघ सध्या 6 पैकी 4 सामने जिंकून 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

Team India | Dainik Gomantak