Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 9 वा फिफा महिला वर्ल्डकप खेळवला जात आहे.
या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले होते, त्यातून आता अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत.
उपांत्य फेरीत स्पेन, स्विडन, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार संघांनी स्थान मिळवले आहे.
यंदा महिला फिफा वर्ल्डकपला नवा विजेता मिळणार आहे. कारण यंदा उपांत्य फेरी गाठलेल्या चारही संघांनी यापूर्वी विश्वविजेतेपद मिळवलेले नाही.
उपांत्य फेरीत १५ ऑगस्ट रोजी स्पेन आणि स्विडन या संघांमध्ये आणि 16 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये सामने होणार आहेत.
भारतीय प्रमाणवेळेनुसार 15 ऑगस्ट रोजी स्पेन आणि स्विडन या संघात होणारा सामना दुपारी 1.30 वाजता, तर 16 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात होणारा सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होईल.
उपांत्य फेरीत विजय मिळवणारे संघ रविवारी 20 ऑगस्ट रोजी अंतिम सामना खेळतील. तर पराभूत होणारे संघ 19 ऑगस्ट रोजी तिसऱ्या स्थानासाठी आमने-सामने येतील.