Akshay Nirmale
काजूपासून बनणारे फेनी हे पेय गोव्याचे हेरिटेज ड्रिंक म्हणून ओळखले जाते.
सध्या फेणी गोवा वगळता इतर राज्यात विक्री करता येत नाही.
500 वर्षांपासून फेणी बनवली जात असल्याचे सांगितले जाते.
फेणी बनविण्याची पद्धतीचा वारसा गोव्यातील काही कुटूंबांनी जपला आहे.
काजूचे फळ पायाने तुडवून त्याचा रस काढला जातो. त्यानंतर हा रस माती किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवला जातो. आणि हे भांडे जमिनीत पुरले जाते.
ठराविक काळानंतर हे भांडे चुलीवर ठेऊन त्याची वाफ साठवली जाते.
फेणीचा वापर औषध म्हणूनही केला जातो. याचा वापर दातांच्या समस्या, हिरड्या सुजणे यासह इतर आजारांवर करतात.