Health Tips: औषधांमुळे शरीरात उष्णतेचा त्रास जाणवतोय? आजच करा 'हे' घरगुती उपाय

Ganeshprasad Gogate

उष्णता घालवण्यासाठी स्नेहन, अभ्यंग, पदाभ्यंग, नाभीपूरण इत्यादी मार्गाने शरीरात तेल जाणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीरातील रुक्षता कमी होण्यास मदत होते.

Health Tips | Dainik Gomantak

जेवणामधून तेल, तूप, तीळ, काजुगर, नारळ (म्हणजेच ज्या पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण आहे)  या पदार्थांचा समावेश करावा.

Health Tips | Dainik Gomantak

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके हा सर्वोत्तम पर्याय आहे. दररोज राजी 100 ग्रॅम मनुका कोमट पाण्यात भिजवावे. सकाळी उठल्यावर या मनुका पाण्यासकट चावून खाव्यात.

Health Tips | Dainik Gomantak

ताकामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे दररोज दुपारी जेवण झाल्यावर ताक प्यावं. मात्र रात्रीच्या वेळी कधीही ताकाचं सेवन करु नये.

Health Tips | Dainik Gomantak

जिरे अत्यंत थंड आहेत. त्यामुळे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरं घालावेत. त्यानंतर सकाळी हे पाणी प्यावे, यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

Health Tips | Dainik Gomantak

सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी घ्यावा, यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

Health Tips | Dainik Gomantak

शक्यतो कलिंगड, ताडगोळे, द्राक्ष, डाळींब या पाणीदार फळांचं सेवन करावं.

Health Tips | Dainik Gomantak
web story | Dainik Gomantak