FC Barcelona ने पाच वर्षांनी जिंकले ला लीगा

Pranali Kodre

बार्सिलोनाने जिंकले ला लीगा

बार्सिलोना एफसीने 14 मे रोजी स्पॅनिश फुटबॉल चॅम्पियनशीप ला लीगाचे विजेतेपद जिंकले आहे.

FC Barcelona | Twitter

बार्सिलोना विजयी

कॉर्नेला एल-प्रॅट स्टेडियमवर बार्सिलोनाने अंतिम सामन्यात आरसीडी इस्पानियॉलला 4-2 अशा गोल फरकाने पराभूत केले.

FC Barcelona | Twitter

पाच वर्षांनी विजेतेपद

त्यामुळे बार्सिलोनाने पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ला लीगा ट्रॉफी जिंकली आहे.

FC Barcelona | Twitter

मेस्सीशिवाय पहिल्यांदाच विजेतेपद

तसेच बार्सिलोनाने लिओनल मेस्सीने क्लब सोडल्यानंतर पहिल्यांदाच ला लीगाचे विजेतेपद मिळवले.

Lionel Messi | Twitter

मार्ग झालेत वेगळे

मेस्सीने दोन वर्षांपूर्वी बार्सिलोना संघ सोडला होता.

Lionel Messi | Twitter

लेवान्दोस्कीचे दोन गोल

बार्सिलोनाकडून या सामन्यात रॉबर्ट लेवान्दोस्कीने 11 व्या आणि 40 व्या मिनिटाला दोन गोल केले.

FC Barcelona | Twitter

बाल्डे आणि कौंडे यांचेही गोल

तसेच बार्सिलोनाकडून ऍलेजांद्रो बाल्डे आणि ज्युल कौंडे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

FC Barcelona | Twitter

इस्पानियॉलचे दोन गोल

इस्पानियॉलकडून जावी पौडो आणि जोसेलू यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

FC Barcelona | Twitter
RR vs RCB | Dainik Gomantak