Akshay Nirmale
गोव्याला 105 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी आता किनारी पोलिसांच्या ताफ्यात वेगवान इंटरसेप्टर बोट दाखल होणार आहे.
या बोटीची निर्मिती गोवा शिपयार्डने केली असून बोटीसाठी 5 कोटी 25 लाख रूपये खर्च आला आहे.
किनारी पोलिसांकडे 9 गस्ती बोटी आहेत. पण त्या 2021 पासून बंद आहेत. 6 रिजिड इन्फ्लेटेबल बोटी आहेत, यातून 5 नॉटिकल मैल अंतरात गस्त घालता येते. पण किनारी पोलिसांकडे 12 नॉटिकल मैलाची जबाबदारी आहे.
या बोटीची गती 32 ते 35 नॉट्स प्रतीतास इतकी आहे. च्रार क्रू मेंबर आणि 10 आसन क्षमतेची ही बोट आहे.
या बोटीची इंधन टाकी 1500 लीटरची असून 150 नॉटिकल मैलापर्यंत या बोटीद्वारे निगराणी करता येऊ शकते.
डेकवर लाईट मशिन गन बसवण्यासाठी जागा, तसेच शस्त्रास्त्रांसाठी लॉकरही आहे.
या बोटीत रडार, इको साऊंडर, कम्युनिकेशन अँड मॅग्नेटिक कंपास, जीपीएस, पोलिस रेडियो, वॉकी टॉकी, मरीन अँड नाईट व्हिजन दुर्बिणी, शोध लाईट्स इत्यादी अत्याधुनिक उपकरणे असतील.