Pranali Kodre
भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू होणार आहे.
या वर्ल्डकपसाठी आयसीसीने शुभंकरचे (Moscots) गुरुग्रामला झालेल्या कार्यक्रमात अनावरण केले आहे.
गुरुग्रामला झालेल्या या कार्यक्रमासाठी भारताचे 19 वर्षांखालील विश्वविजेत्या महिला आणि पुरुष संघाचे कर्णधार शलाफी वर्मा आणि यश धुल उपस्थित होते.
दरम्यान, या शुभंकरचे नामकरण आयसीसीने केलेले नाही. हे शुभंकर स्त्री आणि पुरुष प्रतिनिधित्व करणारे आहेत.
आयसीसीकडून सांगण्यात आले आहे की हे शुभंकर स्त्री-पुरुष समानतेचे प्रतिक असणार असून समानतेचा संदेश देणार आहे.
दरम्यान, आयसीसीने या शुभंकरला नाव देण्यासाठी एक स्पर्धा सुरु केली असून २७ ऑगस्टला ही स्पर्धा संपणार आहे.
त्यामुळे वर्ल्डकप 2023 च्या शुंभकरला नाव देत आपली वेगळी छाप स्पर्धेवर सोडण्याची संधी चाहत्यांना असणार आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान 10 शहरांमध्ये पार पडणार आहे.