Pranali Kodre
जेव्हाही भारताच्या वेगवान गोलंदाजांची चर्चा होते, तेव्हा झहीर खानचे नाव अनेक चाहत्यांना हमखास आठवतो.
भारताचा एक गुणी डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून झहीरने त्याचे क्रिकेटविश्वात गाजवले.
भारताकडून 2011 वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक 21 विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
झहीरचा जन्म 7 ऑक्टोबर 1978 रोजी महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथे झाला.
त्याला लहानपणापासूनच वेगवान गोलंदाजीची गोडी लागली होती.
झहीरने पुढे जाऊन भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करताना मोठे विक्रमही केले.
झहीरने 92 कसोटी सामन्यांमध्ये 311 विकेट्स घेतल्या, तसेच 1231 धावाही केल्या.
त्याने 200 वनडे सामने खेळताना 282 विकेट्स घेतल्या, तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 17 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या.
झहीर चांगला क्रिकेटपटूच नाही, तर एक चांगला व्यावसायिकही आहे. त्याने महाराष्ट्रात हॉटेल्सही आहेत.
झहीरने 2017 मध्ये अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्नही केले.