Ashutosh Masgaunde
Falcon Supernova iPhone 6 ची किंमत 360 कोटी रुपये आहे. हे कस्टम मेड असून त्यात २४ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर फोनला आकर्षक बनवण्यासाठी त्यात हिरेही बसवण्यात आले आहेत.
या फोनची किंमत सुमारे 74 कोटी रुपये आहे आणि त्याची खासियत म्हणजे यात 500 हून अधिक हिरे आहेत. हा फोन 24 कॅरेट सोन्याचा असून त्यात दिलेल्या अॅपलच्या लोगोवर 53 हिरे लावण्यात आले आहेत.
हा देखील एक कस्टमाइज्ड फोन आहे जो अतिशय आकर्षक बनवण्यात आला आहे. या फोनची किंमत जवळपास 60 कोटी आहे. यामध्ये अॅपलच्या लोगोमध्ये एकूण 53 हिरे वापरण्यात आले आहेत.
सुमारे 32 कोटी रुपयांचा हा फोन असून तो ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध डिझाईन स्टुअर्ट ह्यूज आणि त्यांची कंपनी गोल्ड स्ट्रायकर यांनी तयार केला आहे. या फोनमध्ये 22 कॅरेट सोने आणि 200 हिरो वापरण्यात आले आहेत.
याची किंमत सुमारे 18 कोटी रुपये असून ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध ज्वेलर पीटर एलिसन यांनी तो तयार केला आहे. यामध्ये 138 हिरे वापरण्यात आले आहेत.
गोल्डविश ले मिलियन स्मार्टफोनची किंमत 8 कोटी आहे. त्यावेळी सर्वात महागडा फोन बनवल्याबद्दल गोल्डविशला गिनीज बुकमध्येही स्थान देण्यात आले होते.
ग्रेसो लास वेगास जॅकपॉटची किंमत सुमारे 8 कोटी आहे. या फोनमध्ये सोने आणि काळे हिरे तसेच 200 वर्ष जुन्या आफ्रिकन झाडाचे लाकूड वापरण्यात आले आहे.
नोकियाच्या या मोबाईलचाही सर्वात महागड्या फोनच्या यादीत समावेश आहे. मोबाईलचे कव्हर बनवण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मोबाईलची किंमत सुमारे 2 कोटी 50 लाख असल्याचे समजते.