गोमन्तक डिजिटल टीम
प्रवेश परीक्षांमध्ये सर्व विषयांमधील सर्व घटकांवर कमी-अधिक प्रमाणात प्रश्न विचारले जातात. विद्यार्थांनी सर्व विषयांत ‘ऑलराउंडर’ राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
कोणतीही प्रवेश परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा देताना आधी प्रश्नपत्रिकेचा नीट काळजीपूर्वक अभ्यास करा. जुन्या प्रश्नपत्रिका वाचा.
प्रवेश परीक्षांतील बहुतेक प्रश्न हे त्या त्या विषयातील पायाभूत शिक्षणावर आधारित असते. ते केवळ उलट्यासुलट्या पद्धतीने विचारलेले असतात. त्यामुळे प्रश्न पूर्ण वाचून नेमके उत्तर काय अपेक्षित आहे ते ठरवा आणि मगच उत्तर शोधा. घाई करू नका.
पुस्तकी वाचन करण्यापेक्षा अवांतर वाचनही करा. सामान्य ज्ञान वाढवा. त्यावर आधारित प्रश्न सोडवण्याचा सराव करा. माहिती अचूक असल्यास या विषयात भरपूर गुण मिळू शकतात.
तुमची क्षमता ओळखा. केवळ एखादा मित्र म्हणतो आहे, म्हणून कोणतीही प्रवेश परीक्षा देऊ नका. तुम्हाला त्या विषयाची आवड, समज व ज्ञान असेल तरच त्या विषयाच्या वाटेला जा.
जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. यासाठी अधिकाधिक सराव करा. नव्या नियमांची पुरेशी ओळख करून घ्या. त्या दृष्टीने परीक्षेची तयारी करा.
अधिकाधिक प्रश्न सोडवण्याच्या मागे लागण्यापेक्षा तुम्हाला ज्यांच्या उत्तरांबद्दल खात्री आहे असे प्रश्न सोडवा. कोणत्या विभागातील प्रश्नांवर किती वेळ वाया घालवायचा याचे साधारण गणित मांडा.