Pranali Kodre
इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार जॉस बटलर ८ सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
बटलरचा जन्म ८ सप्टेंबर १९९० रोजी टाँटन येथे झाला.
त्याने २०११ साली भारताविरुद्ध मँचेस्टर येथे टी२० सामन्यातून इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
बटलरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इंग्लंडचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे.
बटलरने आत्तापर्यंत (८ सप्टेंबर) ५७ कसोटी सामने, १६५ वनडे आणि १०९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
त्याने २ शतकांसह कसोटीत २९०७ धावा, ११ शतकांसह वनडेत ४६४७ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १ शतकासह २७६६ धावा केल्या आहेत.
यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या बटलरने ३३१ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना यष्टीमागे ४३८ विकेट्स घेतल्या आहेत. यात ३९२ झेल आणि ४६ यष्टीचीतचा समावेश आहे.
बटलर इंग्लंडचा टी२० विश्वविजेता कर्णधारही आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०२२ साली टी२० वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
बटलर २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेल्या ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाचा भागही होता.
बटलरने आयपीएलमध्येही शानदार कामगिरी राहिली आहे. त्याने आयपीएलमध्ये ९६ सामने खेळले असून ५ शतकांसह ३२२३ धावा केल्या आहेत.