HBD James Anderson: इंग्लंडच्या 'यंग' गोलंदाजानं गाठली एकेचाळीशी

Pranali Kodre

वाढदिवस

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन 30 जुलै 2023 रोजी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

James Anderson | Twitter

चाळीशीतही जोश कायम

वयाच्या 41 व्या वर्षीही त्याचा गोलंदाजीतील जोश अजूनही कायम असल्याचा दिसतो.

James Anderson | Twitter

पदार्पण

अँडरसनने 2002 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण तो सुरुवातीला काही वर्षे संघात आत-बाहेर करत होता. पण 2007 पासून त्याने संघातील जागा पक्की केली.

James Anderson | Twitter

कारकिर्द

अँडरसने त्याच्या कारकिर्दीत 180 हून अधिक कसोटी सामने खेळले असून 680 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 194 वनडेत 269 विकेट्स घेतल्या असून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये त्याने 19 सामन्यांत 18 विकेट्स घेतल्यात.

James Anderson | Twitter

धावा

जेम्स अँडरसनने 1500 पेक्षा अधिक धावाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत.

James Anderson | Twitter

तिसरा क्रमांक

अँडरसनने 975 पेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या असून तो सर्वाधिक विकेट्स घेणारा मुथय्या मुरलीधरन (1347) आणि शेन वॉर्न (1001) नंतरचा तिसराच गोलंदाज आहे.

James Anderson | Twitter

एकमेव इंग्लिश गोलंदाज

अँडरसन इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तो 900 हून अधिक विकेट्स घेणारा इंग्लंडचा एकमेव गोलंदाज आहे.

James Anderson | Twitter

विश्वविक्रम

अँडरसनने 2003 ते 2023 अशा सलग 21 वर्षी किमान एक कसोटी विकेट घेतली आहे. असा कारनामा करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

James Anderson | Twitter
Virat Kohli - Rohit Sharma | Dainik Gomantak