गोमन्तक डिजिटल टीम
मस्क यांनी जस्टीन विल्सन या कॅनेडियन लेखिकेशी पहिल्यांदा लग्न केले. जस्टीन आणि एलन या दाम्पत्याच्या पहिल्या अपत्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर या दोघांना पाच अपत्ये झाली. त्यातील एक जुळे आणि एक तिळे आहे.
मस्क यांनी एकुण तीन वेळा लग्न केले. त्यातील दोनवेळा त्यांनी ब्रिटिश अभिनेत्री तलुला रायली (Talulah Riley) हीच्याशी लग्न केले. पण दोन्हीवेळी काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला.
2017 मध्ये मस्क हे अभिनेता जॉनी डेपची पुर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री अंबर हर्डला डेट करत होते. दोघे काही काळ रिलेशनशिपमध्ये होते.
त्यानंतर 2018 मध्ये मस्क हे कॅनेडियन गीतकार, संगीतकार ग्रिम्स हिच्याशी रिलेशनमध्ये होते. ग्रिम्सने मे 2020 मध्ये त्यांच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या 'X AE A-XII' या नावावरून तेव्हा बरीच चर्चा रंगली होती. या दोघांनी सरोगसीद्वारे आणखी एका अपत्याला जन्म दिला आहे.
याशिवाय मस्क यांना त्यांच्या न्युरोलिंक कंपनीतील एक्झिक्युटिव्ह शिवोन झिलिस हीच्यापासूनही एक अपत्य आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे या जोडीने अपत्याला जन्म दिला आहे. सध्या या दोघांमध्ये काही रिलेनशशिप नाही.
सध्या एलन मस्क हे ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशा बॅसेटला डेट करत आहेत. नताशा पटकथा लेखक आणि दिग्दर्शकदेखील आहे.
एलन मस्क यांची Ad-Astra नावाची एक शाळा आहे. जिथे एलन त्यांच्या 5 अपत्यांसह स्पेसएक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या 9 मुलांना शिकवतात.