Rahul sadolikar
हत्ती हा जमिनीवरचा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. बलाढ्य प्राणी असण्यासोबतच हत्तींचं सामाजिक संघटनही माणसाला मार्गदर्शक असंच आहे.
ला सॅले युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ हिलरी क्रॅट्झ म्हणतात, “माणसं गुंतागुंतीची असतात. पण प्राणी निसर्गाच्या प्रेरणेन वर्तन करतात. लहान मुलांना प्राण्यांच्या संपर्कात ठेवलं तर ते खूप काही शिकू शकतात.
किशोर मादी हत्ती त्यांच्यातल्या लहान पिलांना चालायला उभं राहायला, आणि पाण्यात डुंबायला शिकवते.
आपल्या पिलांना हत्ती ज्याप्रकारे शिकवतात त्याच पद्धतीने माणसांनीही आपल्या मुलांना शिकवायला हवं. हत्तींच्या शिक्षणात स्पर्धेपेक्षा आस्तित्वाच्या लढाईसाठी कौशल्य शिकवली जातात.
हत्तीचे अभ्यासक क्रॅटझ म्हणतात त्याप्रमाणे हत्ती कळपातल्या पिलांचं सामुहिक संगोपन करतात त्यामुळे करुणा आणि संयम वाढतो, हे माणसाच्या बाबतीतही होऊ शकतं
हत्ती समुहात आपलं आणि परकं मूल असा भेद करत नाहीत "एखादं कौशल्य शिकवताना हत्ती मिळुन शिकतात आणि शिकवतातही.
हत्तींचे सामाजिक संघटन अत्यंत मजबूत असते. आपल्या समूहातल्या इतर हत्तींची काळजी घेण्यासाठी सगळे तत्पर असतात. हत्तींमध्ये मातृसत्ताक पद्धती असते.