Rahul sadolikar
शतकातला महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना उद्देशून लिहिलेल्या त्यांच्या पत्रांमध्ये आणि ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वांची प्रशंसा केली. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीची 1931 सालची ही पत्रे आहेत.
आपल्या मॉडर्न टाईम्स या चित्रपटात चार्ली चॅप्लीनने यंत्र आणि माणूस यावर भाष्य केलं आहे. यंत्रांचे गुलाम बनू नका हा चित्रपटातून चार्लीने दिलेला संदेश म. गांधीजींच्या भेटीचा प्रभाव होता.
मानवी हक्कासांठी लढल्या गेलेल्या अमेरिकेतील चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्युथर किंग एकदा म्हणाले होते, "ख्रिस्ताने आम्हाला ध्येये दिली आणि महात्मा गांधींनी युक्ती."
कृष्णवर्णीय लोकांच्या चळवळीचे नेते नेल्सन मंडेला यांच्यावरही महात्मा गांधीजींचा मोठा प्रभाव होता. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापर्यंतच्या प्रवासाचे नेतृत्व करणाऱ्या मंडेला यांना 'दक्षिण आफ्रिकेचे गांधी' असे संबोधले जाते.
आपल्यावरचा महात्मा गांधींचा प्रभाव सांगताना बौद्ध धर्मगुरू दलाई लामा म्हणाले होते "मला महात्मा गांधींबद्दल सर्वात जास्त कौतुक आहे. ते मानवी स्वभावाची खोल समज असलेले एक महान मानव होते. त्यांच्या जीवनाने मला प्रेरणा दिली आहे."