Gym Tips: जिममध्ये 2 तास व्यायाम करुनही पोट नाही कमी होत नाहीये? लगेच आहारात करा 'हा' बदल, नाहीतर...

Manish Jadhav

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी

दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून करा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि चयापचय वेगवान होतो, ज्यामुळे चरबी वेगाने घटण्यास मदत होते.

Gym Tips | Dainik Gomantak

साखर आणि मैद्याला रामराम

साखर, मैदा आणि कोल्ड ड्रिंक्स यांपासून पूर्णपणे लांब राहा. गोड पदार्थांमुळे पोटात चरबी झपाट्याने जमा होते, त्यामुळे साखरेऐवजी गूळ किंवा नैसर्गिक गोव्याचा वापर करा.

Gym Tips | Dainik Gomantak

भरपूर पाणी पिण्याची सवय

दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी आवर्जून प्या. पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते, अनावश्यक भूक लागत नाही आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते.

Gym Tips | Dainik Gomantak

फायबरयुक्त आहाराचा समावेश

जेवणात पालेभाज्या, फळे, ओट्स आणि कडधान्यांचा वापर वाढवा. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट हलके राहते.

Gym Tips | Dainik Gomantak

रोज 30 मिनिटे व्यायाम किंवा चालणे

रोज सकाळी वेगाने चालणे, पळणे किंवा घरच्या घरी प्लँक (Plank) व सूर्य नमस्कारासारखे सोपे व्यायाम करा. यामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि चरबी लवकर विरघळते.

Gym Tips | Dainik Gomantak

रात्रीचे जेवण हलके आणि वेळेवर

रात्रीचे जेवण झोपण्याच्या कमीत कमी 2 तास आधी घ्या आणि ते नेहमी हलके-फुलके ठेवा. उशिरा खाल्ल्याने अन्न पचत नाही आणि ती चरबी पोटात जमा होऊ लागते.

Gym Tips | Dainik Gomantak

पुरेशी आणि गाढ झोप

रात्री किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात ताणतणाव वाढवणारे हार्मोन्स निर्माण होतात, ज्यामुळे वजन आणि बेली फॅट दोन्ही वाढू लागतात.

Nahargarh Fort: 9 राण्या, 9 महाल आणि सेम डिझाइन! अरावलीच्या कुशीत वसलेला 'नाहरगड किल्ला', जिथून दिसते गुलाबी नगरी

Gym Tips | Dainik Gomantak