Akshata Chhatre
आज आपण चमचा, काटा वापरून खाणं सहज स्विकारलं आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीत हाताने जेवण करणे ही फार जुनी आणि मोलाची परंपरा आहे.
ही सवय केवळ सांस्कृतिक नाही, तर तिच्यामागे आरोग्य, मानसिक समाधान आणि नातेसंबंध मजबूत करण्याचे महत्त्व आहे.
आपल्या बोटांमध्ये नाजूक संवेदना असतात. हाताने अन्न स्पर्शल्यावर मेंदूला लगेच सिग्नल जातो "जेवण आलं आहे!" यामुळे पचन सुधारतं आणि शरीर अन्नातील पोषण चांगलं शोषून घेतं.
चमच्याने खाल्लं की आपण किती खातोय याचं भान राहत नाही. पण हाताने खाल्ल्यास आपण गरजेइतकंच खातो. त्यामुळे अति खाणं टळतं आणि शरीराचं वजनही संतुलित राहतं.
हाताने खाणं म्हणजे अन्नाचा स्पर्श, वास, आणि चव या तिन्हीचा अनुभव घेणं. यामुळे जेवणात एक आनंदाचा क्षण तयार होतो.
यातूनच ‘माइंडफुल ईटिंग’ म्हणजेच सजग खाणं घडतं जे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
हाताने जेवलं की अन्न वाटून घेण्याची, एकत्र बसण्याची संस्कृती आपोआप येते. यामुळे घरात प्रेम, एकोप्याचं वातावरण तयार होतं.