Puja Bonkile
आजारांपासून दूर राहायचे असेल तर आहारात फळांचा समावेश करणे गरजेचे आहे.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीराला हायड्रेट करते आणि प्रतिकारशक्ती देखील वाढवते. रोज दोन ते तीन संत्री खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असते. याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे बीपी नियंत्रणात राहतो.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आंब्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
तुम्ही तुमच्या आहारात स्ट्रॉबेरीचाही समावेश करू शकता. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.