Akshata Chhatre
सौंदर्य प्रसाधनांचा कितीही वापर केला, तरी खऱ्या अर्थाने त्वचेला आरोग्यदायी आणि दीर्घकालीन चमक हवी असेल, तर सुरुवात आतून करावी लागते.
सकाळी 12 पूर्वी फळं खाणं हे त्वचेसाठी एक सोपं पण अत्यंत प्रभावी गुपित आहे. याच वेळेत आपली पचनक्रिया सर्वाधिक सक्रिय असते. त्यामुळे फळांतील पोषकद्रव्यं त्वचेला आतून पोषण देतात आणि नैसर्गिक ग्लो निर्माण होतो.
एलाजिक अॅसिड कोलेजन नष्ट होण्यापासून वाचवतं, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, फाइन लाइन्स कमी, त्वचेला एकसंध पोत.
भरपूर व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स, कोलेजन निर्माणात मदत,सुरकुत्या कमी, त्वचा टवटवीत.
रेसव्हेराट्रॉल नावाचं अँटी-एजिंग कंपाउंड, सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचं संरक्षण, त्वचा आतून निरोगी आणि लवचिक.