Akshata Chhatre
आपल्याला वेलदोडा म्हणजेच वेलची प्रामुख्याने मसाल्याच्या डब्यात किंवा चहा बनवताना आठवते, पण ही छोटीशी सुगंधी वेलची आरोग्यासाठी किती बहुगुणी आहे.
सकाळी रिकाम्या पोटी वेलदोडा पाण्यासोबत घेतल्याने पचनशक्ती वाढते, अपचन, गॅस, एसिडिटी आणि पोट फुगण्याच्या तक्रारी कमी होतात.
नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स जे पचनसंस्थेतील विषारी घटक बाहेर टाकतात; तसेच वेलदोडा शरीरातील फॅट बर्निंगला चालना देतो.
वेलदोडा श्वसनसंस्थेसाठीही उपयुक्त असून अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल घटक घशातील खवखव, सर्दी, खोकला यावर आराम देतात.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही तो नैसर्गिक माउथफ्रेशनर ठरतो, कारण त्यातील घटक तोंडातील बॅक्टेरियांचा नाश करतात.
वेलदोडा फक्त चहात घालायचा जिन्नस नसून, रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास हे छोटंसं पण प्रभावी घरगुती औषध तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे वरदान ठरू शकतं.