Weight Loss Tips: पोटाची चरबी कमी करण्यासाठी सात योगासने

Pramod Yadav

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ताडासनापासून आसनांचा अभ्यास करावा. ताडासनामुळे संपूर्ण शरीराला ताणले जाते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

ताडासन | Dainik Gomantak

हस्तपादासन आसनाच्या अभ्यासात कंबर आणि पोटावर जास्त ताण येतो. यामुळे कंबर तसेच पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होत

हस्तपादासन | Dainik Gomantak

पश्चिमतानासन आसनात संपूर्ण भार पोटावर येत असल्यानं पोट कमी करण्यासाठी तुम्हाला नक्की मदत मिळेल.

पश्चिमतानासन | Dainik Gomantak

पवनमुक्तासन आसनामुळे गॅसेसच्या समस्या कमी होतात आणि पोटाचं आरोग्यही सुधारते. या आसनामध्ये पोटावर ताण येतो.

पवनमुक्तासन | Dainik Gomantak

भुजंगासनामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण आल्यानं पचन संस्थेचं कार्य सुधारते. अपचनाच्या समस्या कमी होतात. महत्त्वाचे म्हणजे पोट आणि कमरेवरील चरबी कमी होते.

भुजंगासन | Dainik Gomantak

धनुरासनची अंतिम स्थिती धनुष्याच्या आकारासारखी दिसते. पोट आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे आसन म्हणजे उत्तम उपाय आहे.

धनुरासन | Dainik Gomantak

नौकासनामुळे तुम्हाला पोटावरील चरबी करण्यासाठी चांगली मदत मिळले. कारण या आसनामध्ये पोटावरच जास्त ताण येतो.

नौकासन | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak
क्लिक करा