रागावर नियंत्रण ठेवण्याचं सोपे उपाय

Akshata Chhatre

आदर आणि संवाद

कोणतेही नाते यशस्वी होण्यासाठी त्यात प्रेम, विश्वास, आदर आणि संवाद असणे आवश्यक आहे.

easy tips to control anger | Dainik Gomantak

चिडचिड किंवा संताप

सतत होणारी चिडचिड किंवा संताप हे नात्यातील दुराव्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

easy tips to control anger | Dainik Gomantak

रागावर नियंत्रण

अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. चला जाणून घेऊया राग नियंत्रित करण्यासाठी काही सोपे उपाय.

easy tips to control anger | Dainik Gomantak

बोलण्यापूर्वी विचार

जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा लगेचच काहीही बोलू नका. बोलण्याआधी १० आकडे मोजा आणि शांतपणे विचार करा.

easy tips to control anger | Dainik Gomantak

स्वतःच्या चुकांवर हसा

आयुष्यात ताणतणाव कमी करण्यासाठी स्वतःवर हसण्याची सवय लावा. तुमच्या काही मूर्ख कृती किंवा अपेक्षांवर हसून त्यांना हलक्याफुलक्या पद्धतीने घ्या.

easy tips to control anger | Dainik Gomantak

स्वतःबद्दल जागरूक

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःबद्दल जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा राग, प्रेम, दया किंवा मत्सर या भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.

easy tips to control anger | Dainik Gomantak

व्यायाम

तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा. व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन बाहेर पडते, जे ताणतणाव आणि राग कमी करण्यास मदत करते.

easy tips to control anger | Dainik Gomantak

काही जणांना का हवासा वाटतो विवाहबाह्य संबंध?

आणखीन बघा